मानव धर्म की जय, धर्माने विश्वाला शांती.
नवीन वह्या खरेदी करणेस उत्तम मुहूर्त ।।
गुरूवार दि. १२ / ११ / २०२० संपूर्ण दिवस उत्तम
गुरूवार
दि. १२ / ११ / २०२० संपूर्ण दिवस उत्तम
शुक्रवार
दि. १३ / ११ / २०२०
सकाळी ८ वा.१० ते ११.१० वाजेपर्यंत
दुपारी १२ वा.२५ ते २.०५ वाजेपर्यंत
दुपारी ०३ वा.४० ते ५.०७ वाजेपर्यंत
वसुबारस ।।
गुरूवार, दि. १२ / ११ / २०२० रोजी संपूर्ण दिवस उत्तम आहे. सवत्स गाईचे पुजन करावे. वासरू
असलेल्या गाईचे पुजन करावे, कारण गाईचे पुजन करून गाईस घास घालून तिच्या पाठीवरून हात
फिरवला असता आपल्या शरीरातील अनेक रोग बरे होतात. याच दिवशी ११ वेळा व अनेक वेळा
गाईच्या पाठीवरून हात फिरवला असता शुगर, हृदयरोग, रक्तातील दोष असे दोष नष्ट होतात म्हणून या
दिवशी गाईचे वासरासहीत पुजन करणे अति उत्तम आहे.
*|| गुरुद्वादशी ||*
गुरूवार दि. १२ / ११ / २०२० रोजी संपूर्ण दिवस उत्तम आहे. या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे
गुरुचे पुजन करावे, ज्याच्या कडून आपण चांगले शिकतो तो गुरु, जीवास सत् म्हणजे परमात्मा याचा
मार्ग दाखवितो किंबहुना सत् वस्तूची प्राप्ती करून देतो त्यास शिवसद्गुरु म्हणतात. जो शुध्द पवित्र
आहे, ज्यास आत्मज्ञान, शिवज्ञान आहे, स्वआत्माशी रत आहे, निर्भय आहे, नित्य तृप्त आहे, सदामुक्त
आहे, सच्चिदानंद रुप आहे अशा शिवसद्गुरुस वस्त्र, द्रव्य, सुवर्ण, भूमि इ. आपल्या यथाशक्तीप्रमाणे
गुरुस दान करणे. गुरु असा हवा शिष्याचे काही न घेणारा व शिष्य असा हवा गुरुला सर्वस्व अर्पण
करणारा, त्यामुळे त्यास ज्ञान, वैराग्य, भक्ती प्राप्त होते.
।। श्री धनत्रयोदशी ब्रह्मपूजा व यम दीपदान
शुक्रवार, दि. १३ / ११ / २०२० या दिवशी धनत्रयोदशीचे पुजन करावे. या दिवशी धन्वंतरीचा
जन्म झाला. घरातील द्रव्य सुवर्ण अलंकार स्वच्छ करणे फार महत्वाचे. जे ज्ञान देणारे धर्म ग्रंथधन
याचे व धनाची पुजा करावी. या दिवशी डॉक्टर, वैद्य व औषध विक्रेते यांनी धन्वंतरी देवीच्या
प्रतिमेचे व शस्त्रे यांची पूजा करावी. याच दिवशी शिवाच्या वरामुळे ब्रम्हपुजा करणे. सायंकाळी
घराबाहेर कणकेचा दिवा लावून दिव्याचे तोंड दक्षिणेस करून लावणे त्यायोगे अपमृत्युचे संकट
4
मानव धर्म की जय, धर्माने विश्वाला शांती.
अपघात टळला जातो. याच दिवशी आकाशामध्ये उल्कादर्शन घेतले असता आपणास संपत्ती प्राप्त
होते. दिपदान केल्यामुळे ज्ञान वाढते. म्हणून दिव्याची पुजा करून आपल्या योग्यतेप्रमाणे तांबा,
चांदी याचे दीपदान पुजन करून स्वामींना जंगम यांना दान करणे.
दिपदान मंत्र मृत्यूनां पाश दण्डाभ्यां कालेन् श्याम्या सह।
त्रयोदशां दीपदानात् सूर्यज प्रीयतांमम ॥
।। नरक चतुर्दशी ।।
शनिवार दि. १४ / ११ / २०२० या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करणे. यादिवशी यम तर्पण केले
असता अनेक संकटांचा नाश होतो. नरकासूर राक्षसासाठी चार वातीचा दिवा शौचालयात लावावा.
आपआपला कुलधर्म व कुलाचाराप्रमाणे कुलदेवास अभिषेक पुजा, जप, ध्यान व दर्शन घेणे
त्यामुळे कुलाचे संरक्षण होते व कुलवृध्दी होते.
पिता (वडिल) असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून पुढील
नावांनी यम तर्पण करावे. १.यमतर्पयामी २.धर्मराजं तर्पयामी ३.मृत्यूं तर्पयामी ४.अंतकं तर्पयामि
५.वैवस्वतं तर्पयामि ६.कालं तर्पयामि ७.सर्वभुतक्षयं तर्पयामि ८.औदुंबरं तर्पयामि ९.दध्नं तर्पयामि
१०.नीलं तर्पयामि ११.परमेष्ठिनं तर्पयामि १२.वृकोदरं तर्पयामि १३.चित्रं तर्पयामि १४.चित्रगुप्त तर्पयामि.
।। ॐ श्री महालक्ष्मी, ॐ श्री महासरस्वती (वही), कुबेर पूजन ।।
निज आश्विन कृष्ण अमावास्या शनिवार, दि.१४ / ११ / २०२० रोजी दु.२.२० ते ४.३०,
सायं.६ ते रा.८.१५, रा.९.४० ते रा.१२.४० व रविवार दि.१५ / ११ / २०२० रोजी सकाळी १०
वा.३७ मि. पर्यत अमावास्या आहे.
श्री कुबेर देवता ध्यानमंत्र ।।
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च । भवंत त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः ॥
।। श्री महालक्ष्मी ध्यानमंत्र ।।
धृत्वा श्रीर्मातुलिंगं तदुपरि च गदां खेटकं पानपात्रम् । नागं लिंगं च योनि शिरसि धृतवती राजते हेमवर्णा ॥
आद्या शक्तिस्त्रिरुपा त्रिगुणपरिवृता ब्रह्माणे हेतभूता । विश्वाद्या सृष्टिकत्रीं मम वसतु गृहे सर्वदा सुप्रसन्न ॥
वरील मंत्राचा जप १०८ वेळा केला असता धन, धान्य, लक्ष्मी प्राप्त होते.
।। ॐ श्री महासरस्वती पूजन, वहीपूजन, बलिप्रतिपदा ।।
कार्तिक शुक्ल प्रतिपदा रविवार, दि.१५ / ११ / २०२० रोजी सायं. ६.०० ते रा.९.४७,
सोमवार, दि.१६ /११ / २०२० पहाटे ०५ ते सकाळी ०७ वा. ०७ मि. पर्यंत आहे.
ॐ श्री सरस्वती ध्यान मंत्र ।।
सुरासुरै सेवितपादपंकजा । करे विराजत् कमनीयपुस्तका ॥
विरिंचिपत्नी कमलासनस्थिता । सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा ॥
या मंत्राचा १०८ वेळा जप व ध्यान केले असता विद्या प्राप्त होते.
भाऊबीज ।।
सोमवार दि.१६ /११ / २०२० या दिवशी चंद्राचे दर्शन घेवून पुजा करावे. दुधसाखर व
फुटाण्याची डाळ याचा नैवद्य दाखवून घरात सर्वांना प्रसाद द्यावा यामुळे संपत्ती, धन-धान्य ज्ञान
याची प्राप्ती होते यम द्वितीया यावेळी यम पूजन करून १४ अर्घ्यदान व यमर्तपण करणे, चंद्रदर्शन
घेणे स्त्रियांनी चंद्राला ओवाळणे यादिवशी यमुना नदित गंगास्नान करणे पुण्य कारक आहे.
त्यादिवशी चित्रगुप्त व यमदूत याचे सह यमाचे पुजन करणे. ज्याचे भरणी जन्म नक्षत्र आहे अशा
व्यक्तींनी यमाचे अवश्य पुजन, जपध्यान करणे फायदेशीर आहे.
।। वहीवर प्रथम लिहणेचा मजकूर
॥ श्री जगद्गुरु पंचाचार्य प्रसिदंतू ॥ ॥श्री गजानन प्रसन्न ॥
॥श्री महालक्ष्मी प्रसन्न । ॥ श्री महासरस्वती प्रसन्न । ॥ श्री कुलगुरु देव प्रसन्न ।
अथ स्वस्ती श्री मन्नृप शालिवाहन, शके १९४२ शार्वरी नाम संवत्सरे तथा विक्रम संवत् २०७७
कार्तिक शुध्द प्रतिपदा रोजी, रविवार दि.१५ /११ / २०२० रोजी स.१०.३७ मि. नंतर ते
सोमवार दि. १६ /११ / २०२०सकाळी ०७.०७ मि. पर्यंत प्रतिपदा आहे.
शुभ卐 लाभ
शुभम् ॥ भवतुं यश सुख अमृत
।। पूजेच्या साहित्याची यादी ।।
हळद, कुंकू, भस्म, अष्टगंध, बेल, फुले, दुर्वा, कापूर, उदबत्ती, खडीसाखर, बदाम ९, खारीक
९, खोबरे वाटी ९, हळकुंड ९, सुपारी १५, खाऊची पाने ५१, नारळ ५, केळी १ डझन, लिंबू
संत्री ५, डाळींब ५, पेरू ५, सफरचंद ५, सीताफळ ५, चिक्कू ५, पंचामृत, धने, नवागुळ,
लाह्या, बत्तासे, पेढे, आरती, अक्षता, तांदूळ १ किलो, घंटा, तुपाचे निरांजन, समई,
रांगोळी, अत्तर, कापसाची गेजा वस्त्रे, नेवैद्य आरतीचे ताट, तांब्याचा तांब्या एक, पळी पंचपात्र इ.
सूचना (ज्या ऋतूत जी फळे असतील ती फळे घ्या) कृपया वह्या वरील दिलेल्या वेळेत लिहून ठेवणे.
आरती शंकराची
गुलाल,
तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला कळला ॥ शंकरा ...
आरती करितो तुला । शंकरा आरती करितो तुला ॥धृ॥
सांब सदाशिव दैवत भोळे, स्वरूप तुझे जगा वेगळे ॥
ओंकारातुनि विश्व निर्मिले, परब्रह्म तू खरा ॥ १॥ शंकरा ...
भस्मांकित तव सुंदर कांति, सर्व जगाला देऊनी शांति ॥
हलाहलाते धरिले कंठि नीलकंठ जाहला ॥ २॥ शंकरा ..
तुझिये ठाई भाव विराले जीवशिव दोन्ही ऐक्य जाहले ॥
विश्व सर्व हे शिवमय केले, देई पदी आसरा ॥३॥शंकरा .